उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 चर्मकार समाजातील चांभार, ढोर, मोची व होलार 18 ते 50 या वयोगटातील व्यक्तींकरीता व्यवसाय करण्यासाठी 50 टक्के अनुदान योजना आणि  बीज भांडवल या दोन योजना येथील संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय मार्फत सुरु आहे.

  इच्छुक व्यक्तींनी चालु वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला, कोटेशन आणि बँक पासबुकची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे जोडून जिल्हा कार्यालयात तीन प्रतींमध्ये अर्ज सादर करावा. व योजनेच्या अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02472-225069 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.एन ढगे यांनी केले आहे.

 
Top