उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक झुंजार सेनानी महाराष्ट्र विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते स्व. उद्धवराव दादा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी महेश बागल, सौ सुलभा ताई पाटील-देशमुख, पत्रकार देविदास पाठक, आदित्य पाटील , सागर बागल , बालाजी घाडगे अप्पा जागीरदार सह दिसत आहेत.

या निमित्तानं श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. स्व.उद्धव राव दादांच्या उस्मानाबाद शहरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाविषयी तसेच आगामी काळात सुरू होत असलेल्या  मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वर्गीय उद्धवराव दादांच्या विधीमंडळातील भाषणांच्या पुस्तकाचे विधिमंडळ लायब्ररीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्याची चर्चा करण्यात आली.

 
Top