उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 15 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा आयोजित केलेला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा नगर परिषद निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने स्थगित करण्यात आली आहे. जिल्हयातील एकुण आठ नगर परिषदांसाठी आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.  दि.18 ऑगस्ट 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. निवडणुक आचार संहिता शिथिल झाल्यानंतर या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल याबाबत पुनश्च अवगत करण्यात येईल,  याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे  सहायक आयुक्त संजय गुरव यांनी कळविले आहे.

 हा मेळावा www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. उद्योजकाकडील रिक्त पदे ऑनलाईन टाकण्यात आलेली आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 02472-299434 वर संपर्क साधावा तसेच www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास नियमित भेट देऊन ऑनलाईन सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री. गुरव यांनी केले आहे. -

 
Top