तुळजापूर / प्रतिनिधी-

हंगरगातुळ ते मंगरुळ या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता भाविकांनसह नागरिकांनसाठी धोकादायक बनत चालल्याने या रस्ताची  दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे

तिर्थक्षेञ तुळजापूर ते तिर्थक्षेञ अक्कलकोट ला जाणारा मधला मार्ग सोयीचा व  इंधन बचत करणारा असल्याने या मार्गावरुन मोठ्या संखेने  भाविकांचे  वाहने येजा करतात तसेच भातंब्री , मंगरुळ , कुंभारी, नादुंरी  या गावातील नागरिकांना तालुक्याचे ठिकाणी प्रवास करत असताना याच रस्त्याचा वापर करावा लागतो, माञ या रस्त्यावर दुरुस्ती केलेल्या जागेवर खड्डे पडले असुन विशेषता धोकादायक वळणावर ही खड्डे पडल्याने येथे सातत्याने लहानमोटे अपघात घडत आहेत.  वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे . या रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाची डोळेझाक सुरूच आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करुन यंदा तरी या रस्ताची दर्जदार पध्दतीने दुरुस्ती करुन भाविक नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.


 
Top