परंडा / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे केंद्र शासन व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या द्वारे एक दिवशीय आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात आले.

  यावेळी एम बी पवार यांनी शेतकरी बचत महिला बचत व शेतकरी उत्पादक कंपनी विषयांवर मार्गदर्शन केले तसेच एच एम अनभुले यांनी जेष्ठ नागरिक व ग्रामीण भागातील शेतकरी व उद्योजक यांना वित्त पुरवठा विषयांवर मार्गदर्शन केले असता भोंजा हवेली ग्रामपंचायत येथे शेतकरी लाभार्थी यांना चहा पाणी बिस्कीट वितरण करून समारोप करण्यात आला यावेळी उपसरपंच शिवाजी घाडगे, सेक्रेटरी लांडे जी, डायरेक्टर गणेशदादा नेटके, बागायतदार सतिश नेटके, महारूद्र मोरे, विलास नेटके, संदिपान मोरे, बाळू भांदुर्गे, नवनाथ नेटके, महादेव मोरे, दादा हावळे, हनुमंत कोंडलकर, सत्यवान मोरे, चांगदेव सरवदे व शेतकरी लाभार्थी उपस्थित होते.


 
Top