उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र शासनातर्फे प्रति वर्षी म्हणजे 1 जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधुन वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान वृक्षलागवड योजना राबवली जाते. चालू वर्षाकरीता उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलाकरीता 52,450 वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट दिले असून हे उद्दीष्ट जिल्ह्यातील पोलीस मुख्यायलय, 5 उपविभाग व 18 पोलीस ठाणे यांच्यात वाटून दिले गेले आहे. त्यास अनुसरुन पत्येक उपविभागात व प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर वृक्षारोपन केले जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून पोलीस मुख्यालय आवारात, परिसरात दि. 01 जुलै पासून वृक्षारोपनाचे काम केले जात आहे. 

वृक्षारोपन दरम्यान  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि रामेश्वर खनाळ, जिल्हा विशेष शाखेचे पोनि दसुरकर, पोलीस नियंत्रण कक्षाचे अधिकारी- अंमलदार, राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे, पोलीस कल्याण विभागाचे सपोनि बारवकर, पोलीस अधीक्षकांचे वाचक सपोनि भराटे, बीडीडीएस शाखेचे सपोनि  विनोद चौधरी, अपर पोलीस अधीक्षकांचे वाचक पोउपनि  पवार, बिनतारी संदेश विभागाचे पोनि- श्री. पिटे, पिआरओचे पोउपनि  संदीप ओहोळ व कार्यालयीन अधीक्षक कासेवाड, आस्थाना शाखेच्या स्टाफसह सर्व मंत्रालयीन कर्मचारी यांसह विविध शाखेचे पोलीस अधिकारी- अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी- अंमलदार यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केले.

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असून वृक्षांचा होत असलेला मृत्यु हा पृथ्वीवरील सजीव सृष्‌टीचा हळूवारपणे होत असलेला अंत आहे. हे ध्यानात घेउन मानवाने वृक्षाची लागवड व संवर्धन करावे असे आवाहन  पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

 
Top