लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त संत मारुती महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी तालुक्यातील अनेक गावातुन पायी चालत दिंडी कानेगाव येथे आल्या होत्या. हरी नामाचा गजर करीत अनेक भाविक कानेगाव येथे दर्शनासाठी आले होते. 

संत मारुती महाराज यांच्या पादुकांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आलेल्या वारकरी, भक्तांना फराळाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. व तसेच लोहारा शहरात ही आषाढी एकादशीनिमित्त भाग्यश्री कुंभार यांच्या घरून जगदंबा मंदिर ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर बाल दिंडी काढण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बाल कलाकारांनी भजन भारुडे आणि नृत्य सादर केली. यावेळी  सुधीर कुंभार, विजय कुंभार, गणेश कुंभार, व्यंकटेश पोतदार, विशाल फरीदाबाद कर, प्रशांत शेंडगे, अर्चना शेंडगे, रेणूका हंबीरे, नीता पोतदार, शुभांगी पुकाळे, अश्विनी पुकाळे, ऐश्वर्या माळवदकर ,कोळी मॅडम, मोरे मॅडम, नरूने मॅडम यांनी दिंडीत पुढाकार घेतला होता.


 
Top