नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पावसाच्या पाण्यातुन व चिखलातुन वाट काढत व मोठी कसरत करत शाळेत जावे लागत आहे. लहान, लहान विद्यार्थी चिखलात पाय घसरून पडत आहेत.शाळा प्रशासनाने तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

 येथील बसस्थानकासमोर जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत चांगली असल्याने अनेक पालक आपली मुले या शाळेत शिक्षणासाठी घालत आहेत. या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग भरतात. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २०० च्या पुढे आहे.

  सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शाळेचा मुख्य प्रवेशद्वार ते शाळेत जाण्यासाठीचा रस्ता अतीशय खराब झाला आहे. हा रस्ता अरुंद असल्याने व पावसाचे पाणी बाहेर जायला वाट नसल्याने रस्त्यावरच पावसाचे पाणी थांबते. त्यामुळे या रस्त्यावर पावसाचे पाणी थांबण्याबरोबरच चिखल मोठ्या प्रमाणात होतो. चिखलामुळे या रस्त्यावर निसरंडा झाला आहे. त्यामुळे या चिखलातुन वाट काढत शाळेत जात असताना लहान विद्यार्थी पाय घसरून पडत आहेत.शाळा प्रशासनाने  तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

 
Top