दहिफळ/ प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील गौर येथील विनोद सुरेश लंगडे( वय ३०) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

 मंगळवार दि. ०५ जुलै २०२२ रोजी रात्री ८ वा.राहत्या घरात आडुला गळफास लावून आपले जीवन संपवले आहे सध्या कुठल्या कारणामुळे आत्महत्या झाली हे समजू न शकल्यामुळे नसल्यामुळे आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.    

 सदरील पार्थिवावर त्यांच्या शेतात गौर (वाघोली) येथे दि.०६ जुलै रोजी, सकाळी ०८:०० वा. अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे.   कर्ज बाजारीपणामुळे नैराश्यातून हे पाउल उचलले असावे असे परिसरातून बोलले जात आहे.

   अचानक घडलेल्या घटनेमुळे मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.सर्वंत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

 
Top