उमरगा / प्रतिनिधी-

 भारतीय आयुर्विमा महामंडळ ( एल.आय.सी ) शाखा उस्मानाबाद यांच्यावतीने लोहारा तालुक्यातील अचलेर येथील विमा प्रतिनिधी सचिन सोनकटले यांच्या सहकार्यातून व त्यांनी केलेल्या एल.आय.सी मध्ये चांगल्या कार्यामुळे त्यांना प्रोत्साहन म्हणून अचलेर गावासाठी सामाजिक कार्यासाठी व शैक्षणिक कार्यासाठी प्रोत्साहन म्हणून एक लाख रुपये रकमेचा धनादेश अचलेर ग्रामपंचायत कार्यालयास यांना देण्यात आले. 

या पारीतोषिकाचे वितरण अचलेर येथे भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा उस्मानाबादचे शाखा अधिकारी हनुमान  मासाळे, उपशाखाधिकारी एस.एस.मांडवे, शाखाधिकारी उमरगा डी.के.पाटील व विकासअधिकारी अजय शिलवंत यांच्या हस्ते ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश लोखंडे,ग्रामसेवक एम.के बनशेट्टी, यांना धनादेश देूवून सुपूर्द करण्यात आले. 

यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम माजी सभापती तथा विद्यमान उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नागप्‍पा पाटील, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती सिद्रामप्पा दुलंगे, बँक आफ महाराष्ट्र अचलेर चे शाखाधिकारी राजेशा कुमार, शामराव कुलकर्णी, शिवराज कमलापुरे, मल्लिनाथ सरसंबे, विजयकुमार पाटील, गुरुसिंग बायस, अन्वर शेख, सुधिर बंडगर, दयानंद माळगे, गोपालसिंग राजपुत, मनोज सावरे, प्रशांत पुजारी, रसुल जमादार , अमर जमादार, प्रभाकर पुजारी, प्रभाकर  रूपनुर, सतिश वाघमारे, सुनिल सोमवंशी, गोंविद चव्हाण, बाबू पवार, संदिप राठोड, संदिप पाटील, अशोक स्वामी, अमर स्वामी, आदि, उपस्थित होते. व तसेच या गावासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्यातून एक लाख रुपयांचे पारितोषिक सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल अचलेर चे  विमा प्रतिनिधी सचिन सोनकटले व विमा प्रतिनिधी सौ.सोनाली सचिन सोनकटले यांचा अचलेर ग्रामस्थांच्यावतीने  व भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा उस्मानाबाद यांच्या वतीने सत्कार व अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top