उमरगा / प्रतिनिधी-

येथील दैनिक सामनाचे पत्रकार बालाजी नागोराव गायकवाड(४८) यांचे गुरुवारी रात्री (दि.३०) जून रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर जकेकूर गावातील स्मशान भूमीत शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.अंत्यविधिस सरपंच अनिल बिराजदार, पत्रकार, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.


 
Top