तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील विद्यार्थ्यांनी  एम.टी.एस. आँलपियाड परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.  

सन २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनमान्य राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत तेर ता. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील संस्कृती अमर कोळपे हिने १५० पैकी १४८ , स्वरा शिवाजी जाधव १४६ , रविराज रामा देवकते १४६ , जान्हवी चंद्रकांत कोळपे १४६ , जान्हवी रमाकांत लकडे १४४ गुण मिळवत  घवघवीत यश संपादन केले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे  मुख्याध्यापक खडके   यांनी अभिनंदन केले.

 
Top