तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर  या शक्तीपीठातुन   आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी  होण्यासाठी तिर्थक्षेञ  पंढरपूरला   तुळजा भवानीच्या दरबारातून जाणारी  पायी दिंडी  मंगळवार दि.५रोजी  विठ्ठल मंदिर कासार गल्ली येथून पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे.

   तुळजापूर येथून दरवर्षी आषाढी एकादशीवारीनिमित्त शक्ती पीठ ते भक्ती पीठ पायी दिंडी निघते हे 14 वे वर्षे असून गेल्या दोन वर्षी कोरोणामुळे दिंडी गेली नव्हती.पण यावर्षी कोरोना कमी झाल्याने मोठ्या उत्साहात दिंडी निघणार असून या दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी दिनांक ४ सोमवार रोजी पर्यंत आपले नावे दिंडीचे खंडू महाराज भास्कर व सुहास साळुंके,धनंजय हिबारे यांच्याकडे नोंदवावी असे दिंडीचे प्रमुख नगरसेवक अमर मगर यांनी केले आहे.

 
Top