परंडा/ प्रतिनिधी-

इस्लामपुर आगाराची बस इस्लामपुर - परंडा - आवाटी या बस सेवेला कायम स्वरूपी मान्यता मिळाली आहे . बुधवारी ( दि.२९ ) या बसला परंडा आगारात फुलांनी सजवून पुजन करण्यात आले.

    यावेळी परंडा जैन मंदीर ट्रस्टी व प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष किरण शहा, काँग्रेसचे माजी नगरसेवक अॅड .नुरो६ीन चौधरी,तपासणी पथकाचे वाय . डी . पाटील , नंदू वडतले, चालक वाय. झेड. पोटेकर ,इस्लामपुर आगार बसचे चालक हरुण पटेल, वाहक संतोष विदेकर , जुलफीकार जिनेरी,वाहक कासीम मुलाणी, हावरे, विटकर उपस्थित होते .शहा यांच्या पाठपुराव्यामुळे परिवहन मंत्री अनील परब यांनी बस सेवेस मान्यता दिली .हि बस इस्लामपुर येथुन सकाळी १० : ३० वाजता निघते सांगली - मिरज - सांगोला - पंढरपुर कुर्डवाडी - परंडा - आवाटी असा मार्ग आहे . सायंकाळी ५ वाजता आवाटी येथे मुक्कामी पोहचते व आवाटी येथुन सकाळी ७ : ३० वाजता तर परंडा  बसस्थानक येथुन सकाळी ८ वाजता इस्लामपुरकडे मार्गस्थ होते .या बससेवेमुळे या भागातील प्रवाशांना परंडा किल्ला, हजरत ख्वाजा बद्रोद्दीन दर्गाह, आवाटी दर्गाह आदि दर्शनासाठी सोयीचे झाले आहे.  

 
Top