परंडा / प्रतिनिधी-

श्री क्षेत्र भगवान गड जिल्हा बीड येथील श्री संत भगवान बाबा यांची पालखी दिनांक 5 जुलै 2022 वार मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता परंडा शहरात येत आहे.

श्री ह. भ. प. डाॅ. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी कल्याणसागर समुह परंडा यांचे पदाधिकारी यांना पत्राद्वारे कळवले आहे.

परंडा शहर पालखीचे स्वागत, वारकऱ्यांच्या अयोग्य तपासणी,दिंडी प्रमुखाचा सत्कार, सर्वांना महाप्रसाद याची संपूर्ण व्यवस्था कल्याणसागर समुहाचे संस्थापक अध्यक्ष आ. श्री सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहीती कल्याणसागर समुहाच्या सचिव सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी दिली आहे.

 
Top