उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर उस्मानाबाद येथे व्यवस्थापन शास्त्र विभागा मार्फत दिनांक १४ ते १९ जुलै २०२२ दरम्यान “विद्यापीठ उप-परिसर आपल्या भेटीला” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उप –परिसरातील १० शैक्षणिक विभाग व उप-परीसर कार्यालय मार्फत मा. संचालक व विभाग प्रतिनिधी यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती “फेसबुक लाईव्ह” च्या माध्यमातून प्रकाशित केल्या गेल्या. मुलाखतीचे सर्व १३ भाग ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत. मुलाखतीतून प्रत्येक विभागाची सुरवात, माहिती, संशोधन, उपलब्ध सेवा सुविधा, कार्यक्रम, नौकरी संधी, माजी विद्यार्थी, विशेष कार्य, शिष्यवृत्ती सुविधा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संधी, प्रवेश पात्रता व प्रक्रिया अशा विविध बाबीची माहिती देण्यात आली. याचा फायदा सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक प्रेमी यांना होणार आहे. या उपक्रमातून विद्यापीठ उप-परिसर समाजापर्यंत पोहचण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या सर्व १३ भागाच्या प्रसारणा वेळेस मोठा प्रतिसाद लाभला.

 या उपक्रमाची सांगता दिनांक १९ जुलै रोजी कार्यक्रमाने करण्यात आली. या वेळी विद्यापीठ उप-परिसराचे  मा. संचालक डॉ. डी. के. गायकवाड, सहाय्यक कुलसचिव श्री.भगवान फड, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव उपस्थित होते. या १३ भागाची मुलाखत डॉ. विक्रम शिंदे, डॉ. जितेंद्र शिंदे व डॉ. जी. डी. कोकणे यांनी घेतली. सर्वांच्या मनातील प्रश्न व उपयुक्त माहिती या मुलाखतकारांनी सर्वापर्यंत पोहचवली. या उपक्रमाचे आयोजन हे मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव प्रा. डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना मा. संचालक यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करून शिक्षणाला समाजापर्यंत पोहचवले पाहिजे, तसेच उपलब्ध संधी गरुजू पर्यंत घेऊन गेले पाहिजे, अशा उपक्रमातून विद्यापीठ व समाज यांच्यात “कनेक्ट” होण्यास मदत होईल असे संबोधले. समारोप कार्यक्रमात सर्व मुलाखत देणारे व घेणारे यांचा “मुलाखती दरम्यान आठवणीतील फोटो फ्रेम” देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास डॉ सुयोग अमृतराव यांनी उप-परिसराची “हेल्थ आणि वेल्थ” कशी व्यवस्थापना द्वारे विकसित होऊ शकेल याची माहिती दिली. श्री. भगवान फड यांनी स्पर्धा परीक्षा बाबत अपेक्षा व्यक्त केल्या. उपक्रमातील अनुभवाच्या प्रतिक्रिया देताना प्रा. जितेंद्र कुलकर्णी, डॉ. अशोक हुंबे, श्री. विद्याधर गुरव, डॉ. विक्रम शिंदे यांनी मनोगतव्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन बस्सैये यांनी तर आभार प्रा. वरून कळसे यांनी मानले. कार्यक्रमास उप-परिसरातील डॉ. मनीषा असोरे, डॉ. रमेश चौगुले, डॉ. नितीन पाटील, डॉ. महेश कळलावे, डॉ. किशन हावळ, डॉ. एम. के. पाटील, डॉ. गणेश शिंदे, डॉ. अशोक हुंबे, श्री. सुरज पाटील तसेच ईतर शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


 
Top