तुळजापूर / प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय , तुळजापूरच्या अंतिम वर्षाच्या २१ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटव्दारे निवड करण्यात आली आहे.शुक्रवार दि. १८ रोजी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे करियर लॅब , पुणे या कंपनीच्या वतीने परिक्षा व ऑनलाईन मुलाखतीमध्ये ६० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये महाविद्यालयातील विविध शाखांच्या २१ विद्यार्थ्यांची निवड करून कामावरती रूजू होण्याचे आदेश देण्यात आले . या कॅम्पस प्लेसमेंटव्दारे स्थापत्य विभागातील ८ , यांत्रिकी विभागातील ९ व अणुवैजिक व दूरसंचार विभागातील १ व संगणक विभागातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे . निवड झालेल्या प्रत्येकास प्रतिवर्षी रू . ४ लाख प्रमाणे वार्षीक वेतन ६ महिन्याच्या प्रशिक्षणानंतर देण्यात येणार आहेत तसेच प्रशिक्षणादरम्यान रू . १२,००० वेतन देण्यात येणार आहे
या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर तसेच उपविभागीय अधिकारी डॉ . योगेश खरमाटे , सौदागर तांदळे , आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच योगिता कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे . या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्र . प्राचार्य , प्रा . मुदकन्ना आर.जी. , प्रबंधक सौ . कोळी मॅडम तसेच टिपीओ विभागाचे प्रमुख प्रा . पी.ए. हंगरगेकर , प्रा . सौ . घाडगे सी . ए . , प्रा . सौ . सुरवसे पी . एम . सर्व विभाग प्रमुख तसेच यांत्रिकी विभागाचे विद्यार्थी शुभम बिराजदार , शुभम कुलकर्णी , साहील उपासे , आदित्य धुमाळ यांनी परिश्रम घेतले .