उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील  सोलापूर रोड, रोमा हॉटेल शेजारी शासनमान्य ताडी दुकानाचा परवाना दिला असून तेथे ताडी  व्यवसाय चालु आहे. तो परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत अरुण इंगळे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, या दुकानाच्या पश्चिम बाजुस महादेव मंदीर वर्षानुवर्षे असून दुकानापासून त्याचे अंतर १०० ते १५० फूट आहे. तसेच त्या शेजारीच पाथ्रुडवाडा येथे हनुमान मंदीर आहे. तर त्या ठिकाणाहून शाळेच्या विद्यार्थ्यांची आवक जावक भरपूर प्रमाणात असल्यामुळे ताडी पिऊन धिंगाणा, गैरवर्तन करणाऱ्यांचे प्रमाणही खूप वाढत आहे. या दुकानामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे त्या दुकानावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासह परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.


 
Top