उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांच्या  मार्फत विविध कर्ज योजनेतर्गंत उस्मानाबाद जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदाराने कर्ज वितरीत करण्यात येते,त्यानुसार सन 2022-23 या वित्तीय वर्षाकरिता योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.

 बीज भांडवल योजना, रक्कम मर्यादा पाच लक्ष रु.महामंडळाचा सहभाग 20 टक्के लाभार्थीचा सहभाग पाच टक्के बॅकेचा सहभाग 75 टक्के उपरोक्त  दोन्ही योजना जिल्हा कार्यालयास अर्ज उपलब्ध असून अधिक माहितीसाठी इच्छुक लाभार्थीना महामंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यालयात संपर्क करावा,

 तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना-10 लक्ष पर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजना, व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.उपरोक्त योजनेची अधिक माहितीसाठी महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfdc.org वर उपलब्ध असून  वरील योजना ऑनलाईन स्वरूपात आहे. असे आवाहन येथील जिल्हा व्यवस्थापक  यांनी केले आहे.


 
Top