उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) गावचे सुपुत्र प्रवीण उमाकांत रणदिवे यांचा पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला. सारोळा येथे शुक्रवारी( दि. 1) हा सोहळा संपन्न झाला. 

तत्पूर्वी पीएसआय रणदिवे यांची उघड्या टपाच्या जीपमधून गावातून वाजत -गाजत भव्य- दिव्य मिरवणूक काढण्यात आली. सारोळा येथील प्रवीण रणदिवे यांनी पोलीस सब इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत प्रशिक्षण देखील यशस्वी पूर्ण केले. त्यांची मुंबई येथे पहिली पोस्टिंग करण्यात आली.  सारोळा गावात पीएसआय होण्याचा पहिला बहुमान प्रवीण रणदिवे यांनी मिळविल्याने गावाच्या वतीने शुक्रवारी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगीत विशारद दीपक लिंगे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थिती माजी जि. प. सदस्य अँड. शामसुंदर सारोळकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच सुधाकर देवगिरे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब रणदिवे, माजी चेअरमन रमेश रणदिवे ओडियस कंपनीचे अँड. अमोल रणदिवे ज्येष्ठ नेते जीवन  चंदने, धैर्यधर पाटील, अशोक चंदने, दलितमित्र पुरस्कारमूर्ती पांडुरंग कठारे, सोसायटीचे संचालक अमर बाकले, उमाकांत रणदिवे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मुंडे ,खंडू शिंदे ,महादेव लिंगे ,नंदकुमार रणदिवे, गोविंद सारोळकर, सोमनाथ कटारे, निळकंठ रणदिवे आदी उपस्थित होते.

 
Top