तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा अम्युचर अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ४ जुलै रोजी तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय अॅथलेटिक्स ( मैदानी ) स्पर्धेत तेर ता. उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील अजय गलांडे ,आशा चामे , संजीवनी पांढरे , दीक्षा पवार  , समिक्षा खटींग ,  रोहिणी देवकुळे , रोहण पांचाळ  , भाग्यश्री लोमटे आदि खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले .यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे 

यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी मुख्याध्यापक जे. के. बेदरे यांच्या हस्ते सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी एस. एस .बळवंतराव ,  एम. एन. शितोळे  , महादेव भंडारे , एस .यु. गोडगे , आर. एम . देवकते , एस. बी .पाटील , ए .बी. वाघेरे ,  ए. टी. कोळी , एम .टी. चव्हाण , एम .डी. नरसिंगे , एम. एन. रणदिवे , एम. एल .कांबळे , एस. डी .घाडगे , अरुण सोनटक्के ,  रत्नप्रभा साखरे , विलास वाघमोडे  आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 

 
Top