उमरगा /प्रतिनिधी

 जकेकुर चौरस्त्या येथून पुण्याला प्रवासी घेऊन जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसची आयशर ट्रकला जोरदार समोरा समोर धडक बसून ट्रक चालक जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्स बस मधील दहा प्रवाशी जखमी झाले ही घटना तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बलसूर पाटी जवळ  घडली. 

यांचे सविस्तर वृत्त असे की सोलापूर येथून हैदराबाद कडे भरधाव धावणारा आयशर कंटेनर ट्रक आणि जकेकुर चौरस्त्या येथून पुण्याला प्रवाशी घेऊन जाणारी खाजगी लक्झरी ट्रॅव्हल्स बस ची समोरासमोर धडक बसून ट्रक चालक राजेंद्र शिवराम गेजगे (वय ४० वर्षे रा. दाळिंब ता उमरगा) हा जागेवर ठार झाला तर बस मधील दहा प्रवाशी जखमी झाले आहेत.

जखमींची नावे- शांताबाई यशवंत चिंचोरकर , रेश्मा सुनील गायकवाड, सुनील गोरोबा गायकवाड ,बाबाजी मगर कांबळे, रामलिंग मनोहर कुंभार, सानवी रमेश कोठमाळे  ,  राज्यु यशवंत चिंचोरकर  , मनोज नामदेव भुसे, अरुण बाबू पवार ,बबन महादेव जांभळे  यांच्यावर  उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत तर रामलिंग कुंभार व बबन जांभळे यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच उमरगा पोलीस ठाण्याचे सपोनि समाधान कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना सद्गुरू नरेंद्र महाराज नानिज धाम च्या रुग्णवाहिकेने उपचारास दाखल केले.


 
Top