लोहारा/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तर्गे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.राजु गायकवाड, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.