उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी आणि श्री येडेश्वरी देवीच्या पावन जिल्ह्यामध्ये आराधी लोककलावंत मोठ्या प्रमाणात आहेत. पारंपारिक वाद्यांच्या गजरात देवीची गाणी म्हणणार्‍या या आराधी मंडळांच्या मदतीला शिवसेना उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके नेहमीच धावून जातात. याच भावनेतून छत्रपती शाहू नगर येथील सौ.अनुसया गायकवाड यांच्या आराधी मंडळाला वाद्यांची भेट प्रशांत साळुंके यांनी दिली आहे.

छत्रपती शाहू नगर येथील श्री येडेश्वरी देवी मंदिरात या आराधी मंडळाला ढोलकी, झांज असे पारंपारिक वाद्य प्रशांत (बापू) साळुंके यांनी सुपुर्द केले. याबद्दल आराधी मंडळाच्या सौ.अनुसया गायकवाड यांच्यासह महिला भगिनींनी प्रशांत साळुंके यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सुधीर बंडगर, अमित कांबळे, बाबासाहेब मैंदाड, विपिन शिंदे, बालाजी गवळी गायकवाड यांच्यासह देवीभक्त, आराधी मंडळाच्या महिला उपस्थित होत्या.

 
Top