उस्मानाबाद /प्रतिनिधी

येथील प्रसिद्ध कापड व्यापारी तथा माजी नगरसेवक महावीर शांतीनाथ  चाकवते (वय ९३) याचे सोमवारी (दि. २५) दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, विवाहित तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २६) सकाळी ८.०० वाजता कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कापड व्यापारी रवींद्र चाकवते, मनोज चाकवते  सकल जैन समाजाचे अध्यक्ष उल्हास चाकवते यांचे ते वडील होते.

 
Top