उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कैं.नरसिंगराव दादांनी स्वातंत्रपूर्व व स्वातंत्रोत्तर अश्या दोन्ही काळात न्यायालयीन कामकाज पाहिले. निजाम राजवटीत सरकारी कामकाजासाठी सक्तीच्या उर्दू भाषेचा प्रघात असताना न्यायालयात मराठी भाषेचा वापर केल्यामुळे त्यांना राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यास सामोरे जावे लागले होते. निजाम राजवटीत मराठी मुलांना शिक्षण भेटावे यासाठी मराठा व तत्सम बहुजन शिक्षण परिषदेची स्थापना करून संस्थेत मराठी मुलांनाच नौकऱ्या देण्याचा ठराव पारित केल्यामुळे निजामाने संस्थेवर बंदी आणली. पुढे निजामाविरुद्ध सशस्त्र लढा देऊन हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले व मराठवाड्याला निजामाच्या जोखड्यातून मुक्त केले.

सावकारी विरुद्ध मोफत खटले लढणारे शेतकऱ्यांचे कैवारी वकील म्हणून त्यांची ख्याती होती. स्वतंत्र भारताच्या पहिल्या राज्यसभेवर ते खासदार होते. 

या प्रसंगी वक्ते म्हणून अविनाश  देशमुख व विश्वदीप खोसेपाटील, वकील संघाचे उपाध्यक्ष अमोल गुंड यांनी भाषण केले. ऍड शिवाजीराव बाराते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.  त्यावेळी  सूत्र संचालन ऍड. प्रितेश उंबरे यांनी केले व इतर विधिज्ञ मंडळाचे माजी आजी सदस्य  उपस्थित होते

 
Top