तुळजापूर / प्रतिनिधी-

 वाईटातुन चांगले घडतय आजची परिस्थिती पाहुन आम्ही चक्रावलो आहे राजकारणापासुन अलिप्त असणारी मंडळी साहेबांना भेटुन पाठींबा देवुन यात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगत असुन सामान्य माणसाचे व जनतेचे मिळालेले प्रेम अविस्मरणीय असुन यातुन उध्दव ठाकरे  किती विश्वासहर्त नेते आहेत हे सिध्द होत आहे असे प्रतिपादन उपसभापती निलम गोरे यांनी तुळजापूर येथे पञकार परीषदेत सांगितले .

 विधानपरिषद उपसभापती निलम गोरे यांनी रविवारी तिर्थक्षेञ तुळजापूरात दाखल होताच प्रथम   श्रीतुळजाभवानी मंदीरात जावुन  श्रीतुळजाभवानी मातेस  दोन किलो वजनाचे सवालाख रुपये किंमतीचा चांदीचा पादुकांचे पुजन करुन ते मंदीर संस्थान कडे सपूर्द केले. 

 यावेळी बोलताना पुढे म्हणाल्या की, तिर्थक्षेञ तुळजापूर चा विकास रखडला असल्याने या  खडलेल्या  विकासास चालना देण्यासाठी तसेच भाविकांना न्याय देण्यासाठी मंदीर संबंधितांची सर्वसमावैशक   आयुक्त स्तरावर घेणार आहेयात भाविकांचे मते  प्राधान्याने विचारात घेवुन  भाविकांना न्याय देणार असल्याचे स्पष्ट केले.

   राज्यातील  इतर देवस्थांन मध्ये भाविकांन सह अन्य मंडळीना ऐकच नियम आहे तो येथे नाही देविदर्शन देताना येथे भेदभाव होतो.हे अयोग्य आहे  भाविकांना देविंजींचा पायावर डोके ठेवु द्या  मुंढीला धरुन डोके ठेवु नका .यासह  अनेक भाविकांचे प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.तिर्थक्षेञ तुळजापूर पंढरपूर गाणगापुर अक्कलकोट जोडुन  चतुष्कोणी  महामार्ग तयार करा असे यावेळी म्हणाल्या. 

 राज्यपाल कोश्यारी चे महाराष्ट्र बद्दल वादग्रस्त विधानावर बोलताना म्हणाल्या कि  पक्षप्रमुखांनी सांगितलेले औषध त्यांना लागू पडेल असे विधान केले. शिवसेना पक्ष व चिन्हा बाबतीत बोलताना म्हणाल्या कि सर्वाच्य न्यायालय पक्षघटना व सर्व गोष्टीचा विचार करुन निर्णय देईल 

माध्यमे  शिवसेने बाबतीत वाटेल तसे फटकारे मारत आहेत हे अयोग्य असे वाटते कुठलाही  विचार न करता माध्यमातून बातम्या देवू नये यापुर्वीच्या ईडी सीबीय चौकशांचे काय झाले मुंबई महानगर पालिकेने  काळ्या यादीत टाकलेले  कंञाटदार आज नागपूर महानगर पालीकेत काम करीत आहेत. लातूरच्या  कल्पना गिरी, सुशांत राजपूत  प्रकरण होवुन आज अनेक वर्ष झाले  हे प्रकरणांन बाबतीत माध्यमांनी किती आवाज उठवला असा सवाल केला.

 आ. कैलास पाटील, शामल पवार, सुधीर कदम, सुनिल जाधव, संजय भोसले, चेतन बंडगर लोभे शंकर  सह पदाधिकारी उपस्थितीत होते. 

 
Top