उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विशेष अतिसार नियत्रंण पंधरवडा कार्यक्रम १ जुलै ते १५ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियान व सस्टेनेबल डेव्हलपमेन्टल गोल्स् यांचे एक उद्दिष्ट आहे. देशात ५ वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे.

७ टक्के बालके अतिसारामुळे दगावतात आणि हया बालकांचे मृत्यूचे प्रमाण उन्हाळयात व पावसाळयात जास्त असते. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम जिल्ह्यात दि. १ ते १५ जुलै २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

सदर कालावधीमध्ये १२४६ आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातुन ० ते ५ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांच्या घरी भेट देवून ओ. आर. एस. पॉकिट व ज्या बालकांना अतिसार असेल अशा बालकांना झिंक गोळयाचे वाटप करण्यात येवून त्याठिकाणी स्वच्छता राखणे स्वच्छ हात धुणे याचे प्रात्यक्षिकही आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्याच बरोबर शालेय विद्यार्थी, शाळा व अंगणवाडयामधून जेवणापूर्वी व शौचानंतर साबण पाण्याने स्वच्छ हात धुण्याच्या पध्दती सांगण्यात आल्या. यासाठी विविध उदाहरणाच्या माध्यमातून या आजाराची लक्षणे मुलांना सांगण्यात आली. याचा सर्वांनाच फायदा होत आहे.

 
Top