वाशी / प्रतिनिधी-

 छत्रपती शिवाजी विद्यालय , वाशी या विद्यालयातील एस.एस.सी. परीक्षा मार्च 2022 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ,बार्शी येथील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

संकेत संजय कावळे ,रामेश्वर महादेव कुर्वलकर, कल्याणी रमेश कवडे , वैभव नानासाहेब उंदरे , स्नेहा नेताजी नलवडे , राधा मारुती उंदरे , पार्थ संजय गायकवाड या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी. वाय. यादव , जनरल सेक्रेटरी पी. टी  पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे  व उस्मानाबाद जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी  मिरगणे  व सोलापूर जिल्ह्याच्या उपशिक्षणाधिकारी सुलभाताई वठारे  या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.व्ही. गाढवे सर्व शिक्षक- शिक्षिका ,शिक्षिकेत्तर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाच्या वतीने केले.


 
Top