उमरगा/ प्रतिनिधी-

शहरातील अंतुबळी सभागृहात मिशन वात्सल्य समिती उमरगा , कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती उमरगा व  तहसिल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला मेळावा घेण्यात आला.  

तहसिलदार राहुल पाटील, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुसया पवार, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक उस्मानाबाद श्री. हणभर व मिटकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक व्ही.टी.चव्हाण, प्रा. अनिता मुदकण्णा, डॉ. विक्रम आळगेकर, डॉ. साळूंके, प्रा. विनोद देवरकर उपस्थित होते.

मेळाव्याची सुरूवात स्वागत गीताने झाली. यावेळी मुंबई येथील सामाजीक संस्थेच्या वतीने गरजू महिलांना मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. उमरगा येथील अभियंता संजय सरपे यांच्या वतीने एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना व्यवसाय मार्गदर्शन, विशेष सहाय्य योजनेचे मार्गदर्शन व निराधार योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार राहुल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुसया पवार, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक उस्मानाबाद श्री. हणभर व मिटकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक व्ही.टी.चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.  प्रा. अनिता मुदकन्ना यांनी एकल महीलांना जगावे कसे या विषयी मार्गदर्शन केले. 

मेळाव्यास विधवा, परितक्त्या व निराधार महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विजय जाधव, विजय तळभोगे, ईस्माईल शेख, अशोक बनसोडे, महादेव पाटील यांच्यासह अंगणवाडी महीला व तहसिल कर्मचाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला.  भैरवनाथ कानडे यांनी सुत्रसंचलन केले. 

 
Top