नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्था संचालित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या अफरातफर प्रकरणाची चौकशी करावी तसेच बनावट सहशिक्षकाची केलेली नेमणुक रद्द करावी या मागणीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै. शिवाजीराव पाटील बाभळगावकर यांच्या धर्मपत्नी श्रीमती शकुंतला शिवाजीराव पाटील बाभळगावकर व त्यांचे पुत्र व संस्थेचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव पाटील बाभळगावकर यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला दि.१ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

   दि.३० जुन पासुन श्रीमती शकुंतला शिवाजीराव पाटील बाभळगावकर व संभाजीराव पाटील बाभळगावकर हे नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करीत आहेत.आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.

        या आंदोलनाला बाभळगाव येथील महिला व पुरुषांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर दि.१ जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन श्रीमती शकुंतला शिवाजीराव पाटील बाभळगावकर व संभाजीराव पाटील बाभळगावकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक नितीन कासार व शरद बागल हे होते.


 
Top