तेर  / प्रतिनिधी-

 विषमुक्त व आरोग्यवर्धक अन्नधान्य निर्माण करण्याच्या संशोधनाचा प्रचार व प्रसार करण्याची मागणी तेर येथील शेतीनिष्ठ शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे आग्रहाची मागणी केली आहे.

प्रतिवर्षी रासायनिक खताचे प्रमाण 20% कमी करून सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवले व त्याच खतावर जीवामृत सोडून जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या लाखोच्या संख्येमध्ये वाढवून जमिनीचे कर्ब.    ( उत्पादकता) वाढवणे आवश्यक आहे. यासाठी साधन म्हणून शेतकरी सध्या वापरत आहेत .त्याच तिफणीमध्ये किरकोळ बदल करून कमी खर्चात (पाच हजार रुपये) उद्दिष्ट साध्य करता येईल, एक गाय असेल तर दहा एकर शेती, एक शेळी असेल तर पाच एकर शेतीची प्रत सुधारते. पारंपारिक पद्धतीमध्ये उकंडयातील खत काढून ट्रॅक्टरने शेतात नेऊन लहान लहान ढीग केले जातात व ते मुजराकडून जमिनीवर पसरून नंतर पाळी ने जमिनीत मिसळले जातात .या पद्धतीमुळे जमिनीच्या पृष्ठभागातील खताचे 50% प्रमाण तण किंवा गवतच खाऊन टाकते. सेंद्रिय खताचा उपयोग 50% ने कमी होतो. सेंद्रिय खतामुळे अनावश्यक खर्च होतो, सेंद्रिय खत पूर्णतः पिकाला मिळत नाही. सेंद्रिय खत जमिनीवर पसरून टाकले असताना प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यातील शेतीसाठीचे उपयुक्त जीवजंतू मरून जातात. मुख्य पिकासाठी सेंद्रिय घटक उशिरा मिळतात. मानवाच्या( शिरेमध्ये)  रक्तवाहिनीमध्ये ज्या पद्धतीने सलाईन व त्याद्वारे इंजेक्शन देऊन औषध त्वरित शरीरभर पोचवले जाते. त्याचप्रमाणे जमिनीच्या पृष्ठभागापासून तीन इंचावर रासायनिक खत व सेंद्रिय खत एकत्रित पेरून दिले जाते व त्यावर मातीचा थोडा थर देऊन जीवामृताचे पाणी टाकले जाते व त्यावर थोडा मातीचा थर येऊन नंतर बियाणे दीड ते दोन इंच खोलीवर बियाणे पडले जाते व ते रासनीद्वारे बुजवले जाते. रासायनिक खताचे प्रमाण एकदम कमी केले तर शेतकऱ्याचे उत्पन्न एकदम घटते. त्यामुळे या पद्धतीमध्ये दरवर्षी वीस ते पंचवीस टक्के रासायनिक खताचे प्रमाण कमी करून सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवले जाऊ शकते. उत्पादन एकदम कमी होण्याची धोका कमी केला जातो. सेंद्रिय खत बियांची मुळीचे जवळच पडल्यामुळे त्याचा उपयोग त्वरित व त्या पिकास 100% होतो आहे. गवताला किंवा तनाला ते सेंद्रिय खत मिळणार नाही व वाया जाणार नाही. कमी खतामध्ये ज्यादा एकर साठी सेंद्रिय खताचा वापर करता येईल. जीवामृत मधील उपयुक्त जिवाणू सेंद्रिय खताच्या( त्याच्या खांद्यावरच) पडल्यामुळे त्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होईल व जमिनीची प्रत सुधारेल. बियाण्यांच्या पिकाचा कोंब सशक्त व आरोग्यदाई, रोगप्रतिकारक शक्ती असलेला निर्माण होईल. विषमुक्त व आरोग्यदायी अन्नधान्य निर्माण होईल. या माझ्या संशोधनाचा उपयोगाचा प्रचार व प्रसार करून भारत देशाच्या शेतकऱ्यांना व नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केला गेला पाहिजे अशी आग्रहाची मागणी तेर येथील शेतीनिष्ठ शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


 
Top