तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शेतीनिष्ठ शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांनी शेतामध्ये बी ,खते व जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी जीवामृतासह पेरणीसाठी ट्रॅक्टरला यंत्र बनवले असून ते पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शेतीनिष्ठ शेतकरी रेवणसिद्ध लामतुरे यांनी जमिनीच्या सुपिकते साठी व पिक उत्पादनासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविलेले आहेत. जीवामृत मधील उपयुक्त जिवाणू सेंद्रिय खतावर पडल्यामुळे त्याचे उत्पादन प्रचंड प्रमाणात होईल व जमिनीची प्रत सुधारेल या कल्पनेने त्यांनी ट्रॅक्टरला शेतातील पेरणी यंत्रामध्ये बी,खते त्याचप्रमाणे जीवामृत जमिनीत जाण्यासाठी त्यात समावेश केलेला आहे. लामतुरे यांच्या या नवीन कल्पनेला समुद्रवाणी येथील गुरुलिंग स्वामी, उस्मानाबाद तालुका कृषी अधिकारी डी .आर .जाधव, कृषी सहायक वैभव लेणेकर, तंत्र अधिकारी सूर्यवंशी यांनी विविध प्रकारच्या केलेल्या मार्गदर्शनाने हे आगळे वेगळे पेरणी यंत्र तयार करण्यात आले आहे. जवळपास पाच हजार रुपये खर्च या पेरणी यंत्राला येतो.बी,खते व जीवामृताची जोड दिल्यास जीवामृत कीड व रोगांना पिकापासून दूर ठेवण्यासाठी प्रतिकार शक्ती उत्पन्न करते,जीवामृत वापरल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते,शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते, पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ होते, पिकाची सहनशीलता वाढते ,रासायनिक खतावर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते हा नविन पेरणी यंत्र तयार करण्याचा उद्देश आहे.

 
Top