उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त; सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडणार व इतर महत्त्वपूर्ण निर्णय : शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आहेत. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, उस्मानाबादच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे - फडणवीस सरकारचे आभार माणुन छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक उस्मानाबाद येथे फटाक्यांची अतिषबाजी करत,एकमेकांना पेढे भरवुन आनंद उत्सव सादर केला.

 जल्लोषादरम्यान सुनील काकडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, अर्चना अंबुरे, राहुल काकडे, युवराज नळे, प्रविण सिरसाठे, संदीप इंगळे, प्रितम मुंडे, सुजित साळुंखे, लक्ष्मण माने, अमोल राजेनिंबाळकर, गणेश एडके, आनंद भालेराव, प्रविण पाठक, पूजा देडे, अमोल पेठे, मेसा जानराव, शेषेराव उंबरे, किशोर पवार, मोहन मुंडे, गणेश इंगळगी, वैभव हांचाटे, अमित कदम, सागर दंडनाईक, सुनील पंगुडवाले, सलमान शेख, प्रसाद मुंडे, धनराज नवले व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top