उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद येथील शिवसेना कार्यालयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या िवरोधात प्रतिकात्मक  फोटोला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. 

भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं असून त्यावरुन गदारोळ निर्माण झाला आहे.या विधानाचा निषेध करण्यासाठी उस्मानाबाद येथे शिवसेना कार्यालयात राज्यापाल भगतसिंह कोशारी यांच्या प्रतिमेला जोडा मारो आंदोलन केले यावेळी भगतसिंह कोशारी यांची राज्यपाल पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने केली आहे, राज्यपाल यांनी इथून पुढे जर बेताल वक्तव्य थांबविले नाही तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल व तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमानी यांनी दिला आहे


 
Top