तेर  / प्रतिनिधी-

ग्रामीण भागांसह शहरी भागातील हुशार गुणवंत व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशासह राज्यात काम करणाऱ्या मुंबई येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने (तेर ता. उस्मानाबाद) येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील जवळपास १५० विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅग , कंपास , चित्रकला वही , रजिस्टर आदि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.                                                        

यावेळी मुख्याध्यापक जे .के. बेदरे , एस. एस. बळवंतराव , एम .एन .शितोळे , शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष एजाज बागवान सदस्य किरण अबदारे, साहेबराव मेटे , नारायण साळुंके , त्रिशाला बुबने , सारिका नाईकवाडी , बबन कोकरे , काकासाहेब देवकते , सहशिक्षक एस .यु .गोडगे , महादेव भंडारे , ए .बी .वाघेरे , ए .बी .नितळीकर , एम. एल .कांबळे , जयसिंग बोराडे , प्राा. सुर्यकांत खटिंग , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , एस .टी .गांगुर्डे , एस .टी. कोळी आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

 
Top