कळंब  / प्रतिनिधी- 

‘विठु माऊली तु माऊली जगाची माऊलीत मुर्ती विठ्ठलाची, या गजरात गजानन महाराज च्या पालखीचे कळंब नगरीत आगमन झाले असुन ठिक ठिकाणी वारकरी मंडळी चे भक्तांनी स्वागत करुन दर्शन घेण्यात आले

महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायातील आराध्य दैवत म्हणून पंढरपूर मधील विठ्ठल माऊली मंदिर होय. आषाढी यात्रेला राज्यातून तसेच बाहेर राज्यातुन लाखोंच्या संख्येने भाविक भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर मध्ये दाखल होतात. यात पायी चालणार्‍या दिंडीतील वारकर्‍यांची संख्या खुप जास्त प्रमाणात असते ऊन वारा थंडी कशाचीच पर्वा न करता माऊली च्या भेटीच्या ओढीने वारकरी पायी चालत असतात. 

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर 2022 या यंदाच्या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी पुन्हा एकदा होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विविध प्रकारची बंधनं या सोहळ्यावर आली होती. कधी एसटीने तर कधी वेगळ्या पद्धतीने संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. परंतु यंदा मात्र विठ्ठलाचे दर्शन मिळणार असल्याने वारकर्‍यांमध्ये आंनदी वातावरण दिसुन येत आहे. मांजरा नदीच्या तीरावर वसलेल्या कळंब नगरीतुन खुप दिंड्या पंढरपूर ला पायी जातात. याच दिंडी मध्ये शेगांव ते पंढरपूर गजानन महाराजांच्या दिंडीचा देखील समावेश आहे दि 27 सोमवार सायंकाळी साहा वाजले च्या दरम्यान गजानन महाराज दिंडी चे कळंब मध्ये आगमन झाले असुन कळंबच्या हद्दीत वारकर्‍यांचे पाऊल पडतात झिमझिम पावसाला सुरुवात झाली असून जनु काय वरुण राजानेच प्रथम पालखीचे स्वागत आशा प्रकारे केल्या चे दिसुन आले 

गजानन महाराजांची पालखी कळंब शहरात येणार असल्याने सकाळ पासून लोकांनी ठिक ठिकाणी चहा पाणी नाष्टा ची सोय करण्यात आली होती. अनेक नेते मंडळी नी या पालखीचे स्वागत करुन दर्शन करण्यात आले 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या सर्व वारकरी मंडळी ची उत्तम प्रकारच्या जेवनाची व्यवस्था माजी नगराध्यक्ष कै नारायन कंरजकर च्या निवास स्थानी करण्यात आली यात बापुराव कंरजकर, अनिल कंरजकर व त्यांचे सर्व नातेवाईक पुर्ण भक्ती भावने सेवा करत असतात यां दिंडी सातशे वारकरी मंडळी चा समावेश आहे तसेच आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका सह इतर वाहणाचा देखील समावेश आहे.


 
Top