तुळजापूर / प्रतिनिधी- 

राजर्षी , लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी  महाराष्ट्रात समतेचे व मानवतेचे पर्व सुरु केले. असे प्रतिपादन सोलापूरचे  जेष्ठ प्रबुद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ . किर्तीपाल गायकवाड यांनी केले. 

तुळजापूर तालुक्यातील नालंदा बुद्ध विहार कुंभारी व दिलपाक प्रतिष्ठान आयोजित राजर्षी , लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम यावेळी ते बोलत होते .

 नालंदा बुद्ध विहार व दिलपाक प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित केलेल्या राजर्षी , लोकराजा छ. शाहू महाराज जयंतीच्या औचित्याने १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळी आयोजित करण्यात आला होता. केदार इंगळे , मंगरूळ जि.प शाळेचे शिक्षक यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास माजी पोलीस अधीक्षक अशोक भालेराव ,ए पी आय चासकर साहेब (तुळजापूर), पी एस आय चनशेट्टी साहेब , शिरीष सीतासावद (निवृत्त विक्रीकर निरीक्षक  हे प्रमुख अतिथी तर प्रमुख वक्ते म्हणून  डॉ . किर्तीपाल गायकवाड यावेळी उपस्थित होते . राजर्षी शाहू महाराज यांचा समग्र क्रांतीकारी जीवनपट त्यांनी श्रोत्यांपुढे उभा करून  डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची ज्ञाननिष्ठा सर्व विद्यार्थांनी जोपासावी असे आवाहन डॉ . गायकवाड यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलपाक सचिन राजेंद्र यांनी केले .

यावेळी पोलीस कर्मचारी यादव ,देशमुख ,वाहन चालक पठाण , गावातील पोलीस पाटील विठ्ठल वडणे,नागेश कोळी ,रुबाब पठाण , पंडित पाटील ,संतोष वडणे , नागनाथ वडणे, मोहन बर्डे ,रमेश जगताप ,बाळू पाटील, अजित तांबे ,रावसाहेब तांबे ,राम रोकडे ,कमलाकर वडणे, व्यंकट वडणे,रामहरी लोहार ,खंडू कुंभार ,अशोक जगताप ,सचिन तांबे दिलपाक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व नालंदा बुद्ध विहाराचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

 
Top