उमरगा/ प्रतिनिधी-

 उमरगा तालुक्यातील तलमोड तपासणी नाका पळसगाव, व शहरातील बस स्टँड परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मंगळवारी दि२१ रोजी पहाटे कारवाई करून ८७ हजार४५० रुपयांचा मुद्देमाल जप्तकरून  दहा गुन्हे दाखल केले तर चार आरोपी विरोधात कारवाई केली.

पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहिम . पी. एच. पवार, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांचे आदेशानुसार व गणेश बारगजे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अतुल कुलकर्णी पोलिस अधिक्षक, उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली, सिमा तपासणी नाका तलमोड, दुय्यम निरीक्षक, उमरगा व दुय्यम निरीक्षक, तुळजापूर या कार्यालयांनी सामुहिकरित्या पळसगाव तांडा, महात्मा फुले नगर व एसटी स्टॅन्ड परीसरातील हातभटटी दारु निर्मीत केंद्र तसेच हातभटटी दारु विक्री केंद्र व ताडी विक्री केंद्रावर छापे घालुन महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ नुसार एकुण १० गुन्हे दाखल केलेले आहेत यात एकुण २९ बॅरलमध्ये तीन हजार ३०० लिटर रसायन  १० रिकामे घागरी, व हातभट्टी दारु ११५ लि, ताडी ७० लि. असा एकुण ८७,४५०/- रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त केलेला एकुण ०४ इसमांवर गुन्हे दाखल केलेले सदरचा मुद्येमाल वाहतुकी योग्य नसल्याने जागीच नाश करण्यात आलेला आहे.

या वेळी उमरगा पोलिस स्टेशनचे निरीक्षक श्री. मनोजकुमार राठोड, सपोनि समाधान कवडे,राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे निरीक्षक,  सचिन भवड, जे. बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक  सुखदेव सिद,. प्रदीप गोणारकर,  झुंबर काळे कर्मचारी, विनोद हजारे, अनिल कोळी, सुरेश वाघमोडे, राहुल चांदणे,राजेंद्रसिंह ठाकुर, वाहन चालक संतोष कलमले आदींनी कारवाई केली.


 
Top