उस्मानाबाद / प्रतिनिधी -

एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या काही आमदारासह सुरत येथे जाऊन नॉट रिचेबल झाल्याने शिवसेना पक्ष चांगलाच अडचणीत आला आहे, शिवसेनेतील काही आमदारांना घेऊन सत्तातर करण्याचा मनसूबा शिंदे यांचा असल्याच बोलले जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत व आमदार ज्ञानराज चौगुले हे नॉट रिचेबल असून ते शिंदे यांच्या गोटात गेल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे सुद्धा शिंदेच्या गळला लागले होते मात्र शिंदेचा मनसुबा व डाव कळताच पाटील ते मोठ्या शिताफिने त्यांच्या तावडीतून निसटले व अनेक संकटावर मात करीत मातोश्रीवर दाखल झाले. कैलास पाटील यांची शिवसेना व ठाकरे कुटुंबा प्रति असलेली एकनिष्ठा या निमित्ताने समोर आली आहे. 

उस्मानाबाद येथील शिवसेना आमदार कैलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांनी जाळ्यात ओढून सुरतला नेण्याचा प्रयत्न केला मात्र ते हुलकवणी देत वाटेतुन निसटले, जीव धोक्यात घालून कैलास पाटील त्या सर्वाना गुगारा देत रात्रीतून निघाले, गुजरात महाराष्ट्र बॉर्डर जवळीत एका अज्ञात ठिकाणाहून भर पावसात 4 किमी पायी आले त्यानंतर मिळेल त्या गाडीने मुंबई गाठली. पायी दुचाकी ट्रक असे मिळेल ते वाहन घेऊन कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली.  खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली 

शिंदे यांनी केलेला प्रकार व त्यांच्या बाबत घडलेले प्रसंग कैलास पाटील यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून सांगितले आहेत. शिंदे हे अनेक आमदारांना बळजबरीने घेऊन गेल्याचा आरोप होत आहे त्याला पुष्टी देताना खासदार संजय राऊत यांनी कैलास पाटील यांच्यावर घडलेला प्रसंग सांगितलं आहे.

 
Top