उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड पाहता शिंदे सोबत उस्मानाबाद जिल्हयातील शिवसेनेचे  कोणी आमदार आहेत का ? या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार कैलास पाटील यांना विचारले असता त्यांनी मी शिवसेनेसोबत असून उमरग्याचे आमदार चौगुले व भूम-परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

उस्मानाबाद जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एक खासदार व तीन आमदार जिल्हयात आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर, उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे  आमदार कैलास पाटील, उमरगा-लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, भूम-परंडा-वाशी मतदार संघाचे आमदार प्रा. तानाजी सावंत या प्रमाणे आहेत. आमदार चौगुले यांना आमदार करण्यात माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे. परंतू चौगुले आमदारकी ची तीन टर्म पुर्ण करून ही मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने किंवा महत्वाचे कोणते पद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचे बोलले जात होते. तर माजीमंत्री प्रा. तानाजी सावंत यांना आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर मंत्री मंडळात स्थान न दिल्यामुळे ते पण नाराज असल्याचे बोलले जात होते. या संदर्भात शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार कैलास पाटील यांच्याशी संपर्क केला असता मी शिवसेनेसोबतच आहे. इतर दोन शिवसेना आमदारासंदर्भात विचारले असता आपण दोन्ही आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

 
Top