उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीकडून 31 मे रोजी जन्मलेल्या 10 कन्यारत्नांचे मोठ्या हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. यावेळी नवजात कन्या रत्नांना प्रत्येकी दोन ड्रेस व मातांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय सोनटक्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आयशा पठाण, अॅड विद्या वाघमारे ,रिबेका भंडारे, मानसी डोलारे, सोनाली काकडे, उषा लांडगे, राजनंदा वाघमोडे, दिपाली डुकरे, संगीता डुकरे ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष पाटील यांनी केले. यावेळी आपले विचार व्यक्त करताना भंडारे मॅडम यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल मध्यवर्ती जयंती समितीचे भरभरून कौतुक केले. मुलगा आणि मुलगी समानता येण्यासाठी, मुलीला पुढे प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पालकांची मानसिकता हळूहळू बदलत असल्याचे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने मुलींना सुद्धा घडवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. जे आपल्या कन्यारत्नांचे अहिल्या नामकरण करणार आहेत त्यांच्या नावे समिती बॅन्केत ठेव ठेवणार असल्याबद्दल सुध्दा त्यांनी आनंद व्यक्त करून महिलांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा व विचाराचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे प्रा. मनोज डोलारे, प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. बालाजी काकडे, संदिप वाघमोडे, नवनाथ काकडे, गणेश एडके, मोहन रत्ने, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी कन्यारत्नांच्या पालकांसमवेत शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयातील कल्पना भाटे, सुनिता भालेराव, जाकीरा शेतसंधी, शोभामाळी, रशीद काझी, गिरिजा परसे, सोनटक्के मॅडम आदि स्टाफ उपस्थित होता.

 
Top