उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297वी जयंती उत्साहात पार पडली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती मार्फत भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांच्या शुभहस्ते या पारंपरिक सवाद्य मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहाल टाॅकीज रोड, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस रोड, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा या मिरवणुकीचा मार्ग होता.

 खूप दिवसानंतर अतिशय पारंपारिक पध्दतीने, आपल्या जपलेल्या संस्कृतीचा ठेवा सादर करत साजर्‍या झालेल्या. जयंतीला समाजबांधवांनी तुफान गर्दी केली होती. 

पारंपारिक ढोलपथक, वसार्‍या घेवून असणारे वारूवाले या सर्वांच्या पथकांनी केलेल्या सादरीकरणाला लोकांनीही भरभरुन दाद दिली, कौतुक केले. सुधीर पाटील आणि इतर प्रमुख पाहुण्यांनीही तरुणाईसोबत वाद्यांच्या ठेक्यावर ताल धरला. धनगर समाजातील नेतेमंडळी तर ढोलकरी बनून मिरवणूक सहभागी झाले.

तत्पूर्वी आ.राणाजगजीतसिंह पाटील व सुधीर पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवींचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, अखिल भारतीय खोखो संघटनेचे सचिव प्रा.डाॅ.चंद्रजीत जाधव, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.मनोज डोलारे, प्रा.बालाजी काकडे, प्रा.डाॅ.कपिल सोनटक्के, प्रा.शिवाजी गाढवे, दिनेश बंडगर, इंद्रजित देवकते, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, गणेश एडके, मुकुंद घुले, श्रीकांत तेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 मिरवणूकीला सर्व समाज बांधवांची गर्दी होऊनही मिरवणूक अतिशय शांत वातावरणात पार पडली. मिरवणूक यशस्वी होण्यासाठी नितीन डुकरे, संदीप वाघमोडे, अशोक गाडेकर, देवा काकडे, किशोर डुकरे, गणेश सोनटक्के, समितीचे सुरेश शिंदे, प्रसाद तेरकर, सचिन चौरे, रवी देवकते, सुरज तांबे, विकी अंधारे, विजय सोनटक्के, प्रशांत लहाडे, नारायण चव्हाण, धनाजी सलगर, युवराज डुकरे, संतोष वतने, सुधीर थोरात, हिराचंद थोरात, नितीन सलगर, योगेश सलगर आदिंनी परिश्रम घेतले.

शेवटी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूकीत सहभागी सर्वांचे प्रा.मनोज डोलारे यांनी आभार मानून मिरवणूकीची सांगता झाली.

 
Top