उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र देऊन सोलापूर-तुलजापूर-उस्मानाबाद  रेल्वे मार्गाच्या कामासाठी ५० टक्के खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. परंतू राज्याच्या मंत्रीमंडळच्या बैठकीत हा विषय घेऊन खर्चाची तरतूद करावी लागते त्यानंतर अधिकृत केंद्र सरकारला कळवावे लागते तसे न केल्यामुळे सोलापूर-तुलजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी पहिले दोन वर्ष पिंक बुकामध्ये १०० टक्के खर्चाची तयारी केली होती,अशी मािहती खा.आेमराजे निंबाळकर यांनी दिली. 

होळकर जयंती दिनानिम्मत शहरात विविध ठिकाणी िशवसेनेचे खासदार राजेनिंबाळकर यांचे कार्यक्रम झाले. यावेळी अामदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर उपस्थित होते. अधिक मािहती देताना खा.ओमराजे निंबाळकर यांनी विकास कामे कसे मार्गी लावावेत हे विरोधकांना माहित नसल्यामुळे ते नुसतेच आमच्यावर आरोप करतात, असे सांगून गेल्या ४० वर्षांत तुमचा, आमचा व या अहिल्यादेवी होळकर चौकाचा ही विकास झाला नव्हता. परंतू आ.कैलास पाटील यांनी हे काम करून दाखविले. 

परिवहन विभागाने बैठक घेतली

 ४ मे २०२२ रोजी परिवहनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर-तुलजापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारचा ५० टक्के निधी मंजूर करण्याबाबतची बैठक झाली. या बैठकीस अामदार कैलास पाटील, परिवहनचे अप्पर मुख्य सचिव  आशिषकुमार सिंह, मध्य रेल्वे मुंबईचे मुख्य अभियंता सुधीर पटेल, परिवहनचे सहसचिव होळकर आदी उपस्थित होते. 

या बैठकीत सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे प्रकल्पाबाबत चर्चा झाली. मध्यरेल्वेचे मुख्य अभियंता यांनी रेल्वेच्या सन-२०२२-२३ पिक बुकामध्ये या रेल्वेमार्गासाठी ५० टक्के ४५२ कोटी ४६ लाख रुपये निधीची तरतुद केली असल्याचे दि. १२ जुलै २०२१ च्या पत्रकाद्वारे कळविले असल्याचे संागितले. यावर परिवहनमंत्री यांनी सोलापूर-तुलजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारचा ५० टक्के सहभाग घेण्याबाबत रेल्वेकडून पिंक बुकाच्या प्रतीसह प्रस्ताव मागवून प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्याबाबत मंत्री मंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणार असल्याचे परिवहन मंत्री यांनी संागितले.

 विकास कामे मार्गी लावण्याची ही पध्दत असते, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगून नुसती पत्रकबाजी करून विकास कामे होत नसतात ,असा टोला ही त्यांनी लगावला. 

 
Top