उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालय उस्मानाबाद  येथे डॉ शामप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिना निमित्त भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बद्द्ल जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी आपल्या मनोगतात डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या बद्दल माहिती दिली. डॉ.श्यामप्रसाद मुखर्जी  यांच्या बलिदानाबद्दल माहिती देताना त्यांनी काश्मीरचा विशेष दर्जा रद्द व्हावा हे त्यांचे ध्येय होते आणि त्या ध्येयासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. पुढे बोलत असताना जनसंघाची स्थापना 1925 साली झाली आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 साली डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रेरणेतून झाली असल्याचे सांगितले, आणि आज त्या छोट्याशा रोपट्याचे एका विशाल वृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे, आज या पार्टीत  राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आशा व अशा अनेक मोठया पदांवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्याचे सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुनिल काकडे, राजेंद्र पाटील, प्रविण सिरसाठे, अभय इंगळे, बालाजी चव्हाण, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, मोहन मुंडे, सागर  दंडनाईक, व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top