उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शिवसेनेत झालेल्या बंडा नंतर जिल्ह्यातील  शिवसेनेत खळबळ उडाली असुन आ.प्रा.तानाजी सावंत व आ.ज्ञानराज चौघुले एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत तर खा.ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील यांनी माञ ठाकरे शिवसेना सोडणार नसल्याचे सांगिले आहे. या सर्व गदारोळात आपल्याला सुध्दा  सुरतला घेउन जात असताना आपण पळुन आल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. त्या नंतर आमदार पाटील यांचा खास सत्कार करण्यात आला यावर बंडखोर गटाचे सांवत यांनी डबल ढोलकी म्हणुन आं पाटील यांच्यावर टिका केली  त्या नंतर ट्रकने पळुन आल्याचे फोटो आ. पाटील यांनी व्हायरल केले जिल्ह्यात  शिवसेनत मोठ्या  प्रमाणात फुट पडली आहे.

शिवसेनेकडून कैलास पाटील यांचा सत्कार


शिवसेनेचे उस्मानाबाद येथील आमदार कैलास पाटील हे बंडखोर शिंदे गटाच्या तावडीतून सुटून शिवसेनेच्या गटात सुखरूप आल्याने त्यांचा मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिवसेनाच्या वतीने पत्रकार परिषद पूर्वी सत्कार करणाऱ्यात आला. खासदार संजय राऊत, विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांच्यासह नेत्यांनी कैलास पाटील यांचा सत्कार करुन त्यांनी दाखविलेल्या धाडसबद्दल कौतुक केले. कैलास पाटील यांच्या एकनिष्ठपणाचे राज्यभर शिवसैनिकांतून कौतुक होत आहे.

आ. कैलास पाटील यांच्यापासून पक्षप्रमुख ठाकरेंनी सावध राहावे-अा. सावंत 


शिवसनेचे आमदार कैलास पाटील हे स्वतः मोठ्या शिताफिने सुरत रस्त्याहुन सुटल्याचे खोटे सांगात असून ते पक्षप्रमुख यांच्यासह प्रसार माध्यमाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी केला आहे. कैलास पाटील हे डबल ढोलकी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यापासून सावध राहावे, कैलास पाटील यांची मुंबईकडे येण्याची व्यवस्था आम्हीच केली होती. कैलास पाटील हे प्रसार माध्यमातून खोटे बोलत आहेत, अश्या बोलण्याने स्वतःचे महत्व वाढत नाही असे सांगत सावंत यांनी सर्व आमदार स्वखुशीने व कोणाचाही दबाव नसताना आले असल्याचे स्पष्ट केले. सावंत यांनी गुवाहटी वरून एक विडिओ प्रसिद्ध केला असून त्यात कैलास पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

साथ सोडणार नाही, खासदार ओमराजे निंबाळकर

 


शिवसेनेचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे दावे सपशेल खोटे असल्याचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांची ढाल बनून आम्ही सर्व खासदार त्यांच्यासोबत आहोत, उध्दव ठाकरे यांनी मला मुलासारखे सांभाळले त्यामुळे त्यांची साथ सोडणे शक्यच नाही असे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले.

उध्दव ठाकरेंनी माझ्या विरोधकाला म्हणजे राणाजगजीतसिंह पाटील यांना केवळ माझ्यामुळे शिवसेना पक्षात घेतले नाही. विधानसभा निवडणुकीवेळी उस्मानाबादची जागा शिवसेनेकडे होती त्यावेळी राणा पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्याची तयारी दाखवली मात्र माझा संघर्ष त्यांनी बघितलेला असल्याने त्यांनी राणा पाटलांना तिकिट नाकारले असा गोप्यस्फोट ओमराजे निंबाळकर यांनी केला.

मला उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम सत्ता दिली त्यामुळे अशा माणसाला संकट समयी सोडून जाणे कदापिही शक्य नाही असे सांगत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचा एकही खासदार पक्ष सोडून जाणार नाही असे सांगितले.

 


 
Top