उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील भारत स्काऊट गाईड कार्यालय सभागृहात उस्मानाबाद परिसरातील इ.१० वी , १२ वी उत्तीर्ण घवघवीत यश संपादित विद्यार्थ्यांचा कालाविष्कार अकादमी उम्मानाबादच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे नगर परिषद उस्मानाबाद चे मुख्याध्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे तर समारंभ अध्यक्ष म्हणून कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे होते. प्रमुख उपस्थिती मधे कलाविष्कार अकादमीचे मार्गदर्शक राजेंद्र अत्रे ,क.अ.उ.चे सचिव शेषनाथ दगडोबा वाघ होते. मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वती पुजन केले . भागवत घेवारे यांच्या प्रास्ताविकानंतर १२० विद्यार्थी संख्या गुणाक्रमे ८० % ते १००% गुणप्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. योग्य नियोजन आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास यश मिळतेच या शब्दात मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी मनोगतपर भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात युवराज नळे यांनी कलाविष्कार अकादमीची भुमिका स्पष्ट करत अशा सत्कार समारंभातूनच विद्यार्थ्यांना पुढील यशाकरिता प्रेरक ठरते असे मत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थी सागर राठोड पालक वनवे यांनीही सत्काराप्रती मनोगत केले . हा सत्कार समारंभ यशस्वी करण्या करिता कलाविष्कार अकादमीचे प्रा .डॉ . अरविंद हंगरगेकर , चित्रकार विजय यादव , सुदेश माळाळे कवी अथर्व कुलकर्णी, अविनाश मुंढे , राजाभाऊ करंडे यांनी परिश्रम घेतले.भा.स्का .गा . उपायुक्त श्री. देशपांडे, पाटील, श्रीमती शिरसट यांनी सहकार्य केले .क.अ. उ. चे कोषाध्यक्ष हणमंत पडवळ यांनी सुत्र सुत्रसंचलन केले तर सदस्य रवींद्र शिंदे यांनी आभार मानले .