तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील माळुंब्रा येथील ग्रामपंचाययतचे उपसरपंच पद गेली अडीच वर्षा पासुन रिक्त असल्याने हे लोकशाही ा मारक असल्याने संबंधित आधिका-याने यात जातीने लक्ष घालुन  उपसरपंच पदाची निवडणुक तातडीने घेऊन माळुंब्रा ग्रामवासियांना उपसरपंच उपलब्ध करुन देण्याची मागणी ग्रामवासियांन मधुन केली जात आहे .

तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गाव प्रगतशिल गाव असुन  अडीच वर्षा पुर्वी येथील उपसरपंचाने राजीनामा दिला होता त्या नंतर कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर  पद रिक्त होत.े  नंतर ग्रामस्थांनी तक्रार देताच निवडणुक लावली निवडणुक प्रक्रिया सुरु होणार म्हणताच याला स्थगिती मिळाली .या स्थगिती बाबतीत काय गौडबंगाल आहे हे अधाप माळुंब्रा वासियांना समजले नाही 

नंतर या तक्रार प्रकरणी समिती नेमली समिती चा अहवाल आला तरीही  निवडणुक घेण्यास शाषण स्तरावरुन कुठलेही पावले उचलले जात नसल्याने हा प्रकार लोकशाहीचा गळा घोटणार आहेतरी या प्रकरणी  निवडणुक घेण्यास टाळटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांनवर कारवाई करण्याची मागणी ग्रामवासियांन मधुन होत आहे

 
Top