तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील तामलवाडी येथे  बालाजी अमाईन्स वतीने  जिल्ह्यातील विविध शाळांनी शालेय साहित्याचे व आरोग्य विभागास ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर उपकरण वितरण करण्यात आले.

  या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता हे होते . यावेळी बालाजीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी , राजेश्वर रेडी , तहसीलदार सौदागर तांदळे , गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड , तांत्रिक सल्लागार मल्लिनाथ बिराजदार, गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव मंचावर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.

 ग्रामीण भागातील शाळांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरवणे व साहित्याचे वितरण बालाजी अमाईन्स कडून केले जाते. याप्रसंगी जिल्ह्यातील अकरा शाळांना स्मार्ट बोर्ड, संगणक ,प्रोजेक्टर , स्मार्ट टीव्ही , प्रयोगशाळा उपकरणे, बेंचेस यांचे वाटप झाले .याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सीएसआर मार्फत करत असलेल्या कामाचे कौतुक केले . त्याबरोबर कोरोना महामारीच्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात बालाजी समूहाने केलेली मदत उल्लेखनिय होती असे सांगून परिसरातील तरुणांनी  उद्योगाकडे करिअर म्हणून पहावे असे आवाहन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी केले .यात त्यांनी कंपनीने आजपर्यंत शिक्षण , आरोग्य , जलसंधारण , स्वच्छता , क्रीडा या क्षेत्रातील कार्याचा आलेख मांडला . राहुल गुप्ता यांनी शाळांचा कायापालट होण्यासाठी संस्थेचे योगदान खूपच उपयुक्त आहे असे सांगून संस्थेची सामाजिक बांधिलकी वैशिष्ट्यपूर्ण आहे असे विचार मांडले . यासाठी विविध शाळांतील मुख्याध्यापक , शिक्षक, विद्यार्थी , समितीचे सदस्य उपस्थित होते .

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विठ्ठल नरवडे यांनी केले .याप्रसंगी श्री. मल्लिनाथ बिराजदार ,प्रसाद सांजेकर , विनोद चुंगे , मारुती सावंत , सचिन मोरे , ज्ञानेश्वर घोटकर , राजेश धोंगडे यांची उपस्थिती होती .

 
Top