तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दर लागु करण्याचा निर्णय घेऊन जीआर काढल्या बद्दल महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियन तालुका शाखेच्या  वतीने  कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती समोर गुलाल उधळुन  आनंदोत्सव साजरा केली.

ग्रामपंचायतचा कर्मचाऱ्यांनी सुधारित किमान वेतन दर लागु करण्यासाठी बावीस महिन्या पासुन विविध आंदोलने केले होते. ग्रामपंचायतचा लोकसंख्या प्रमाणात कुशल अकुशल अर्धकुशल  कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतन दर लागू करण्यात आला आहे. या आनंदोत्सात ञिमुर्ती नवगीरे, वैजीनाथ जळकोट,  गुणवंत शितोळे, सुदर्शन शिनगारे , सागर पवार,  उमेश धनके, विनोद गरगडे, मसाजी कांबळे, शिवलिंग स्वामी ,महादेव भोसले,सलीम शेख,  मारुती पवार,  सचिन कांबळे, गौतम दुपारगुडे,  पोपट कदम, अशोक माळी, कंगले देवानंद रेड्डी,  व्ही.एस ताटेयेलमे सह कर्मचारी उपस्थितीत होते.


 
Top